बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्य सल्लागारांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी. के सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी त्यांनी काही खाजगी कारणांमुळे राजीनामा दिला आहे. कॅबिनेट सेक्रेटरी असलेले पी. के सिन्हा हे आपल्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये त्यांची नियुक्ती पंतप्रधान मोदींच्या मुख्य सल्लागारपदी करण्यात आली होती.

पी. के सिन्हा हे उत्तर प्रदेश कॅडरच्या 1977 बॅचचे आयएएस अधिकारी असून 2015 ते 2019 पर्यंत त्यांनी मंत्रिमंडळात सचिव म्हणून काम पाहिलं आहे. बुधवारपासून सिन्हा हे आपल्या कामावर परतणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रशासकीय कारकिर्दीत सिन्हा यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात विशेष सचिव तसेच विद्युत आणि शिपिंग मंत्रालयात सचिव म्हणूनही कामगिरी पार पाडली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत प्रदिर्घ काम करत असताना उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाच्या पदांवर पी. के सिन्हा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पी. के सिन्हा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. तसेच, ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मधून त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण अर्थशास्त्र या विषयात पूर्ण केले. उच्चशिक्षित असलेल्या आणि प्रशासनावर चांगली पकड असलेल्या अधिकाऱ्याने अचानक राजीनामा दिल्याने त्यांची कमतरता प्रशासनात नक्कीच भासेल.

थोडक्यात बातम्या – 

‘शाकाहारी’ महिलेला चुकून ‘मांसाहारी’ पिझ्झा डिलिव्हर करणं पडलं महागात!

सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार; राजस्थानमधील घटनेनं देश हादरला!

…अन् 15 कोरोना रूग्णांनी मिळेल त्या वाहनांनी घरी धूम ठोकली!

झोमॅटो डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणाऱ्या हितेशा चंद्राणी विरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानात ‘नोटांचा पाऊस’; पैसे गोळा करण्यासाठी उडाली झुंबड, पाहा व्हीडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More