Loading...

“एक्झिट पोल अनाकलनीय; स्ट्राँग रूमच्या बाहेर जॅमर बसवा”

मुंबई |  सोमवारी महाराष्ट्रात विधानसभेसाठीचं मतदान पार पडलं. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. आम्हाला एक्झिट पोल अनाकलनीय आहेत. आणि जनतेच्या मनात देखील संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे  ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सर्व्हेतून दिले जाणारे अंदाज कल्पनेच्या पलीकडचे आहेत मात्र खरी वस्तूस्थिती वेगळी आहे. अंदाज दाखवून ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केला आहे.

Loading...

सर्वच एक्झिट पोलमध्ये जवळपास शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलं आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अक्षरशः पिछेहाट झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतं आहे. पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं थोरात म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसच्या या मागणीवर निवडणूक आयोग काय पाऊल उचलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...

‘श्रीराम समर्थ’ चित्रपटानिमित्त शंतनू मोघे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा…

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...