पुणे। कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आता सगळीकडे वरूण राजाचं जोरदार आगमन झालं आहे. त्यामुळे आता पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक देखील बाहेर पडत आहेत. पावसाला दणक्यात सुरूवात होताच पर्यटकांची पावलं आपसूकच निसर्गाकडे वळतात. पुण्याजवळ अशी काही ठिकाणं आहेत जी पावसाळ्यात फिरण्यासाठी एकदम ओक्के आहेत.
पहिला पाऊस पडला की पर्यटक आधी भुशी डॅमला जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद घेतात. भुशी डॅम हे पुण्यापासून 73 किमी अंतरावर आहे. भुशी धरणाचे पाणी पावसाळ्यात पायर्यावर वाहते. अशा वेळेस हे ठिकाण पाहण्यासारखे असते.
सहयाद्री पर्वत हा महाराष्ट्राला लाभलेलं एक नैसर्गिक वरदान आहे. पर्वताच्या पश्चिम घाटामध्ये असलेलं विलोभनीय निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. हे स्थळ पावसाळ्यात लोकांना आपल्याकडे जणू आकर्षित करतं. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमीची जत्राच भरलेली असते. ताम्हिणी घाट पुण्यापासून 53 किमी अंतरावर आहे.
माळशेज घाटाच्या माथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट. माळशेज घाट म्हणजे आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे. हा घाट पुण्यापासून 126 किमी अंतरावर आहे. तसेच लोहगड (लोह किल्ला) महाराष्ट्रातील अनेक डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे. लोहगड किल्ला बहुतांश काळ मराठा साम्राज्याच्या अंतर्गत होता, मुघल साम्राज्याखाली 5 वर्षांचा अल्प कालावधी मध्ये होता. पुण्यापासून लोहगड हा 65 किमी अंतरावर असून पावसाळ्यात पर्यटकांचं आकर्षण ठरतो.
थोडक्यात बातम्या-
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात जाणार?
बसा बसा म्हणत फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ
नासक्या भाजीची उपमा देत गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बरसले, म्हणाले…
महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!
“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला हवी”
Comments are closed.