‘ते’ धनंजय मुंडेंचंच प्लॅनिंग; मोठा खुलासा समोर

Dhananjay Munde

Dhananjay Munde |  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वाल्मीक कराड यांची धनंजय मुंडेंशी असलेल्या जवळीकमुळे त्यांच्यावर वारंवार आरोप केला जातोय. तसेच धनंजय मुंडेंकडून मंत्रीपद काढून घेण्यात यावं, अशी मागणी देखील करण्यात येतीये.

देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? यावरून मागच्या काही दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात होते. अखेर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदावरून डावलण्यात आलं आहे.

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचंच प्लॅनिंग

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.

बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार कारभार पाहणार आहेत. आता बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणं, यामागे स्वत: धनंजय मुंडे यांचंच प्लॅनिंग असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा खुलासा स्वत: धनंजय मुंडे यांनी केला आहे.

“पुण्याचा जसा विकास झाला, तसाच विकास बीडचा व्हावा”

बीडची सध्याची परिस्थिती बघता, बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांनी स्विकारावी, अशी विनंती मीच केली होती. पुण्याचा जसा विकास झाला, तसाच विकास बीडचा व्हावा, अशी माझी भावना आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनीच दिली आहे.

बीड कार्यकारिणीबाबत लवकरच निर्णय होईल. कागद, पेन घेऊन फिरणारे कार्यकर्ते नको जे काम करतात त्यांना प्राधान्य दिलं जाईल. मुंडेंना आम्ही इतर जिल्ह्याची जबाबदारी देऊ शकलो असतो. परंतु, सध्या ग्राउंडवर जी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना पालकमंत्रिपद दिलेले नाही, असं वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलंय.

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .