बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जमीन विकत घेऊन फक्त गरजूंसाठी अन्नधान्य पिकवण्याचा विचार- हरभजन सिंह

नवी दिल्ली | मी सध्या जालंधर येथे एक शेतजमीन विकत घेऊन त्यावर फक्त गरजू व्यक्तींसाठी अन्नधान्य पिकवण्याचा विचार करतो आहे. माझ्या आजुबाजूच्या परिसरातील मंदीर, इतर गरजू लोकांना हे अन्नधान्य देण्याचा माझा विचार आहे, असं भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने म्हटलं आहे.

हरभजन सिंह ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होता. यावेळी बोलताना मजुरांची परिस्थिती पाहता हरभजनने एक चांगला विचार बोलून दाखवलाय.

मी या सर्व परिस्थितीचे आभार मानेन. मी देखील इतरांची मदत करु शकतो याची जाणीव मला या काळात झाली. माझ्यातली माणुसकी यावेळी जागी झाली असं मी म्हणेन, असं हरभजनने सांगितलंय.

दरम्यान, अनेक क्रिकेटपटूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाविरुद्ध लढ्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला मदत केली होती. हरभजन सिंहनेही घरी परतणाऱ्या कामगारांच्या जेवणाची जबाबदारी घेतली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ

सरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

मुंबईत एकाच दिवशी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू!

“कोरोनाचं संकट गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More