बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘झाडे लावा आणि जास्त मार्क मिळवा’, ‘या’ ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी योजना

चंदीगड | हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन आणि अनोखी योजना जाहीर केली आहे. नवीन जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनी पंचकुला जिल्ह्यातील मोरनी हिल्समध्ये असलेल्या “नेचर कॅम्प” थापली येथे पंचकर्म आरोग्य केंद्राच्या उद्घाटनानंतर नवीन घोषणा केली आहे. नवीन योजनेअंतर्गत वृक्षारोपण करणाऱ्या आणि झाडांची काळजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे. ही योजना राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असेल, असे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितलं. अतिरिक्त गुणांसाठीच्या तरतुदीचा मसुदा लवकरच तयार केला जाईल, असंही ते म्हणाले.

आजूबाजूच्या भागातील तरुणांना पॅराग्लाइडिंगचे प्रशिक्षण दिले जाईल आणि या उपक्रम राबविण्यासाठी क्लबची निर्मिती करण्यात येईल. दिग्गज खेळाडू मिल्खा सिंग यांचे नाव या क्लबचे नाव दिले जाईल, असं देखील खट्टर यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, पूर्वी लोकांना रोमांचक खेळांचा आनंद घेण्यासाठी मनाली व इतर ठिकाणी खूप दूर जावे लागत असे. शिवालिक टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर मोरनी हिल्सच्या क्षेत्रात अशा प्रकारच्या उपक्रमांची सुरुवात करून लोकांना या रोमांचकारी खेळात सहभागी होण्याची संधीच मिळणार आहे. त्यासोबतच आजूबाजूच्या परिसराचा आर्थिक विकास होईल असंही मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं.

 

थोडक्यात बातम्या – 

“विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”

बलात्कारासाठी महिलांचे कपडेच जबाबदार – इम्रान खान

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?; काँग्रेसचा थेट सवाल

‘​​द ग्रेट खली’च्या आई तांदी देवी यांचं निधन

योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More