सावधान! भारतातील मीठ आणि साखरेच्या अनेक ब्रँड्समध्ये आढळला ‘हा’ घातक पदार्थ

Salt and Sugar | जेवणात मीठ नसेल तर त्याची चव लागत नाही. खूप सारे पदार्थ वापरले, मसाले टाकले पण त्यात मीठच नसेल तर तो पदार्थ बेचव होऊन जातो. त्यामुळे आपल्या अन्न पदार्थातील मीठ हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मीठाशिवाय जेवण जाणे जवळपास अशक्यच आहे. मीठ खाण्याचे प्रमाण कमी-जास्त असू शकते. मात्र, मीठ पूर्णतः टाळले जात नाही. मीठ हा शरीरासाठी देखील आवश्यक घटक आहे. त्याचबरोबर साखर देखील जेवणाचा महत्वाचा भाग आहे. भारतीयांची सकाळ रोज एक कप चहाने होते. म्हणजेच, दिवसाची सुरुवातच गोड पदार्थापासून होते. अशात आपण खात असलेल्या मीठ आणि साखर (Salt and Sugar ) या पदार्थांबाबत एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

मीठ आणि साखरमध्ये आढळलं प्लॅस्टिक

भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. अनेक मोठे ब्रँड , छोटे ब्रँड, पॅकेज केलेले किंवा लूज विकले जाणारे या सर्व ब्रॅंडसमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. याबाबत एका प्रसिद्ध अभ्यासात दावा करण्यात आला आहे.

एका प्रसिद्ध पर्यावरण संशोधन संस्थेने ‘मायक्रोप्लास्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर’ या नावाने हा अभ्यास केला. यामध्ये पांढरे मीठ, सेंद्रिय खडे मीठ, समुद्री मीठ आणि कच्चे मीठ यासह 10 प्रकारच्या मीठांवर अभ्यास करण्यात आला. तसेच, ऑनलाइन आणि स्थानिक बाजारातून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरेची तपासणी करण्यात आली. (Salt and Sugar )

संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

या अभ्यासात सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे कण आढळून आले, जे फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसह विविध स्वरूपात आढळले. या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 0.1 मिलिमीटर (मिमी) ते 5 मि.मी. इतका आढळून आला.

अभ्यासानुसार, साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण 11.85 ते 68.25 तुकडे प्रति किलोग्रॅम पर्यंत असल्याचे आढळून आले. हे छोटे प्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून मानवी शरीरात प्रवेश करू शकता, जे शरीरासाठी घातक ठरू शकतात. (Salt and Sugar )

News Title :  Plastic found in Salt and Sugar

महत्त्वाच्या बातम्या-

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या ब्रिटिश गायिकेला करतोय डेट?, फोटो झाले व्हायरल

भाविकांनो पुण्यातील ‘हे’ सर्वात मोठं मंदिर एक महिना बंद राहणार!

प्रफुल पटेलांना पराभवाची धूळ चारणारा ‘हा’ बडा नेता कॉँग्रेसच्या वाटेवर; भाजपला ठोकला रामराम

या दोन राशींच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार!

मोठी बातमी! काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची तब्येत बिघडली, श्वास घेण्यास अडचण