धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतली, सर्जरी दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू
मुंबई | प्लास्टिक सर्जरी दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सुंदर दिसण्यासाठी केलेली प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) 21 वर्षीय अभिनेत्रीच्या जीवावर बेतली आहे.
प्रसिद्ध कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री चेतना राज (Chetana Raj) हिचा ‘फॅट फ्रि’ सर्जरीनंतर मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका खासगी रूग्णालयात वजन कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती. सर्जरी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला फुफ्फुसांमध्ये त्रास जाणवू लागला व तिचा मृत्यू झाला.
चेतना राज हिने तिच्या पालकांना याबद्दल कोणतीही कल्पना न देता मैत्रिणींसोबत एका खासगी रूग्णालयात दाखल झाली होती. 16 मे रोजी तिच्यावर प्लास्टिक सर्जरी पार पडली. मात्र, तिच्या फुफ्फुसात पाणी जमा होऊ लागलं. शिवाय रूग्णालयात अतिदक्षता विभागही नव्हता त्यामुळे दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच चेतनाचा मृत्यू झाला.
दरम्यान, चेतनाचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याची तक्रार चेतनाच्या पालकांनी केली आहे. चेतनाने अनेक कन्नड मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, कोणीतरी तिला ती जाड दिसत असल्याचं सांगितल्याने तिने हे मोठं पाऊल उचललं. चेतनाच्या मृत्यूमुळे तिच्या पालकांसह कन्नड टेलिव्हिजन विश्वही हदरलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘सभा करायच्याच असतील तर…’; दीपाली सय्यद यांचं राज ठाकरेंना आव्हान
‘रोहित बाबा…’; रोहित पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मुंबई महापौरपद कोणाकडे जाणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
Comments are closed.