बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रात्रीस खेळ चाले! फडणवीस आणि काँग्रेस आमदाराच्या गुप्तभेटीच्या चर्चेनं मोठी खळबळ

पणजी | सध्या सर्वत्र निवडणुकांचं वार वाहत आहे. येत्या काळात देशात विधानसभेच्या तर राज्यात महापालिकेच्या निवडणुका (Election) होणार आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये तुफान राजकीय जुगलबंदी रंगली आहे. अशातच गोवा राज्याचे निवडणूक प्रभारी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या भेटीला एक दिग्गज काॅंग्रेस नेता (Congress Leader) रात्रीचा आल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.

सध्या देवेंद्र फडणवीस यांनी गोवा राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी मोठी तयारी चालू केली आहे. यासाठी फडणवीस सातत्यानं गोव्याच्या दौऱ्यावर जात आहेत. मंगळवारी फडणवीस गोवा भाजपच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पणजीत दाखल झाले आणि त्याच रात्री गोवा प्रदेश काॅंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदारांनी त्यांची भेट घेतल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.

गोवा काॅंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एलेक्स रेजिनाल्ड लाॅरेन्स (Alex Reginald Lawrence) यांनी रात्री उशिरा फडणवीस यांची भेट घेतल्यानं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. गत निवडणुकीत काॅँग्रेसनं गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या पण पक्षांतर्गत बंडाळीचा फटका काॅंग्रेसला मोठ्या प्रमाणात बसल्यानं काॅंग्रेसला गोव्यात सत्ता स्थापन करता आली नव्हती.

दरम्यान, लाॅरेन्स यांचा फडणवीस उपस्थित असलेल्या हाॅटेलचा व्हिडिओ वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून फडणवीस यांनी थेट काॅंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनाच फोडल्याची चर्चा रंगली आहे. लाॅरेन्स यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

थोडक्यात बातम्या 

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मिळणार पैसे

तिकडं राष्ट्रवादीचं कार्यालय फुटलं, इकडं ‘ओ शेठ’ गाण्यावर तुफान डान्स

“लग्न झालं, अजित पवार 48 तासांसाठी नवरदेव झाले अन् नवरी…”

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ‘त्या’ स्क्रिनशॉटनंतर क्रांती रेडकर नि:शब्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More