बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्लेऑफचं गणित बिघडलं! हैदराबादचा राजस्थानवर 7 गडी राखून विजय

मुंबई | राजस्थान राॅयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा 40 वा सामना खेळवला गेला. गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेल्या या दोन आक्रमक संघात आज चांगली लढत पहायला मिळाली. या सामन्यात हैदराबादने राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे आता कोलकाताच्या आणि पंजाबच्या संघात आनंदाचं वातावरण असणार आहे.

प्रथम राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात भुवनेश्वर कुमारने खतरनाक अशा लुईसला तंबूत परतवलं. त्यानंतर मात्र, यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक खेळी केला. जयस्वाल बाद झाल्यानंतर महिपाल रोमरोरने अखेरीस काही फटकेबाजी केली आणि राजस्थानने 20 षटकात 164 धावा केल्या.

राजस्थानने दिलेल्या 165 धावांचं आव्हान पार करताना हैदराबादची सुरूवात देखील चांगली झाली. सलामीवीर जेसन राॅयने सुरूवातीपासून आक्रमक फलंदाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन आणि अभिषेक शर्माने हैदराबादला विजय मिळवून दिला.

दरम्यान, या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची आणि हैदराबादच्या जेसन राॅयची फलंदाजी विशेष राहिली. संजूने 57 चेंडूत 82 धावा केला. तर जेसन राॅयने 42 चेंडूत आक्रमक 60 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबाद विजयानंतर आता प्लेऑफचं गणित बिघण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘भाजप एका चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर मलाही…’; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“…त्यांनी जरा डोळे उघडून पहावं, हे आंधळ्या आणि बहिऱ्याचं सरकार”

अबब! भारतीय खेळाडूचा अमेरिकेत धमका, अवघ्या 22 चेंडूत कुटल्या 102 धावा; पाहा व्हिडीओ

‘टिंब टिंब टिंबचा अर्थ काय होतो? आता काय समजायचं माणसानं’; अजित पवारांची टोलेबाजी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More