बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ मोहिम हाती.. जगातील सर्वांत मोठी ट्रायल महाराष्ट्रात!

मुंबई | देशात महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप पाहायला मिळतो आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करत आहे. कोरोना रूग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शनद्वारे उपचार करणं सुरू आहे. अशातच आता ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ मोहिम हाती घेण्यात आली आहे. लोकमतने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्रातल्या 21 महाविद्यालयांमध्ये प्रोजेक्ट प्लॅटिना ही मोहिमेवर काम सुरू केलं जाणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 500 कोरोना बाधितांवर उपचार केले जाणार आहेत. या थेरपीची एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रायल घेणारे देशातीलच नव्हे तर जगातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

प्लाझ्मा थेपरी म्हणजे काय???- 

कोरोनातून पूर्णपणे सावरलेला व्यक्ती त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी तयार झालेल्या असतात, त्या पेशी सध्या कोरोनाने ग्रासलेल्या रूग्णांच्या शरीरात टाकल्या जातात. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि याने कोरोनाबाधित लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता अधिक असते, या सगळ्या प्रकाराला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात.

प्लाझ्मा थेरपीमुळे रिकव्हरी रेट म्हणजे रूग्ण ठणठणीत बरा होण्याचा दर वाढू शकतो, ही खूप दिलासादायक बाब आहे. प्लाझ्मा थेरपी ही सर्वप्रथम अमेरिकेत पार पडली होती. कोरनाला संपवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी ठरणार आहे.

राज्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना प्लाझ्मा थेरपीमुळे रूग्ण बरे देखील होत आहेत. मुंबईनंतर आता पुण्यात देखील प्लाझ्मा  थेरपीला यश मिळालं आहे. तसंच महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात या थेरपीला यश मिळत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राजेश टोपेंकडून महाराष्ट्राला मोठी गूड न्यूज… वाचून तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडाल!

“…तर सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन परवानगी देईल”

महत्वाच्या बातम्या-

फक्त विकेंडला लॉकडाऊन… ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी बि-बियाणे अन् खते दिली बांधावर

कोरोना चाचण्याांसाठी आता सर्वांत कमी दर महाराष्ट्रात, तसंच महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक चाचण्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More