Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कोरोनावर मात करण्यासाठी ‘प्लाझ्मा थेरपी’ शस्त्र, वाचा या थेरपीविषयी सगळी माहिती…

मुंबई | महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी  हे एक शस्त्र बनलेलं आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण आता संकटमोचक म्हणून प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पुढे येत आहेत.

प्लाझ्मा थेपरी म्हणजे काय???- कोरोनातून पूर्णपणे सावरलेला व्यक्ती त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी तयार झालेल्या असतात त्या पेशी सध्या कोरोनाने ग्रासलेल्या रूग्णांच्या शरीरात टाकल्या जातात. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि याने कोरोनाबाधित लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता अधिक असते, या सगळ्या प्रकाराला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात.

प्लाझ्मा थेरपीमुळे रिकव्हरी रेट म्हणजे रूग्ण ठणठणीत बरा होण्याचा दर वाढू शकतो, ही खीप दिलासादायक बाब आहे. प्लाझ्मा थेरपी ही सर्वप्रथम अमेरिकेत पार पडली होती. कोरनाला संपवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी ठरणार आहे. सीसीसीमधील रुग्ण जे बरे होऊन चालले आहेत तिथे १० दिवसानंतर २८ दिवसाच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे. डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररित्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.

कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर्सनी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करून रुग्णांवर उपचार करण्याचे ठरविले. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठीक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील  रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.

हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषधोपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला

विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

भिडे गुरूजी, लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल- महेश लांडगे

आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी…., राजेश टोपेंची घोषणा

कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या