बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुखद धक्का! नीरज चोप्राच्या सन्मानार्थ घेण्यात आला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली | भारताचा भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्राच्या विजयाचा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानं सध्या नीरज चोप्रावर भरमसाठ कौतुकांचा वर्षाव होत आहे. अॅथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला भारतीय ठरल्यानं संपूर्ण देशवासियांच्या आनंदाचा तर ठिकाणाच राहिलेला नाही. अशातच आता भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं नीरजचा मोठा सन्मान केला असल्याचं पाहायला मिळत आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भालाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत अॅथलेटिक्स महासंघाच्या योजना समितीनं मोठी घोषणा केली आहे. नीरजनं 7 ऑगस्टला भालाफेकमध्ये गोल्ड मिळवल्यानं यापुढे प्रत्येक वर्षी 7 ऑगस्ट हा ‘भालाफेक दिवस’ म्हणून साजरा करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रत्येक वर्षी 7 ऑगस्टला भालाफेक दिवसानिमित्त देशभरात भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. महासंघाच्या योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोट यांनी ही माहिती दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. पहिलं 2008 मध्ये मिळालं होतं.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यावर्षी भारताला एकूण 7 मेडल मिळाली. एका ऑलिम्पिकमध्ये एवढी मेडल मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. नीरज चोप्रानं या घोषणेवर आनंद व्यक्त कर एएफआयचं धन्यवाद मानलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली?’; राष्ट्रवादीचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन; पहिल्यांदाच दिसले विनामास्क

खायला डब्बा दिलाय पण तो रिकामाच, संजय राऊतांची घटना दुरूस्तीवरून केंद्रावर टीका

राखी सावंतचा भालाफेकीचा कारनामा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमात केले बदल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More