बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर तोंड बंद ठेवा’; पोलीस अधिकाऱ्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला

वॉशिंग्टन | अमेरिकेत जॉर्ज फ्लाइड यांच्या मृत्यूनंतर प्रचंड हिंसाचार उफाळला आहे. अमेरिकनं नागरीक रस्त्यावर उतरत पोलिसांनी केलेल्या कृत्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आहेत. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून ह्यूस्टनचे पोलीस दलाच्या प्रमुखांनी ट्रम्प यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे

जर तुमच्याकडं सांगण्यासारखं काही नसेल, तर तोंड बंद ठेवा, अशा शब्दात पोलीस अधिकाऱ्याने ट्रम्प यांना सुनावलं आहे.
मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉइड यांना अटक करताना पोलीस अधिकाऱ्यानं त्यांची मान गुडघ्यानं दाबून धरली होती. यात त्यांचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचाराचा उद्रेक झाला.

टेक्सॉस प्रातांतील मिनियापोलीस शहराच्या गव्हर्नरशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी बळाचा वापर करून हिंसाचार शांत करण्याचा सल्ला दिला होता.

ट्रम्प यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर ह्यूस्टन पोलीस प्रमुख आर्ट असीवेदो यांनी ट्रम्प यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

महत्वाच्या बातम्या-

‘इंडिया’ नको ‘भारत’ नावानेच देशाची ओळख व्हावी; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?, जाणून घ्या कारण

कौतुकास्पद! घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More