सांगली | शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदारसंघातील लोकांनी दिलेली मदत घेऊन पूरग्रस्त भागात पोहचले आहेत. बोरगाव, साखरोळे, बहे, वाळवा या भागात जाऊन अमोल कोल्हे यांनी पूरग्रस्तांची विचारपूस करत मी आणि माझा पक्ष संपूर्ण ताकदीने आपल्या पाठिशी उभा आहे. काळजी करू नका, असा विश्वास पूरग्रस्तांना दिला.
‘एक भाकरी पूरग्रस्त बांधवांसाठी’ असं आवाहन अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकांना केलं होतं. शिरूरकरांनी देखील त्यांच्या या आवाहनला प्रतिसाद देत भरघोस मदत केली. हीच मदत डॉ. कोल्हे यांनी पूरग्रस्तांची भेट घेत त्यांच्या हवाली केली.
अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब क्रिएशन’च्या अंतर्गत चालणाऱ्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या दोन्ही मालिकेतल्या कलाकारांनी आपलं एका दिवसांचं मानधन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सोशल मीडियात कौतुक होत आहे.
दरम्यान, अमोल कोल्हेंच्या येण्याने आणि मदतीने उपस्थित लोकांना हायसं वाटलं. खरंच राजं आहात तुम्ही… तुमच्या रूपात आम्हाला छत्रपती शिवराय दिसले. आम्ही तुम्हाला फक्त टीव्हीवर बघत होतो पण तुम्ही आज आमच्यासाठी इथपर्यंत आलात. आज आम्हाला महाराजांचं दर्शन झालं, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
महत्वाच्या बातम्या-
-ब्रह्मनाळमधील बोट उलटल्याची दुर्दैवी घटना; मृतांच्या संखेत वाढ…
-माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग निवडणुकीच्या रिंगणात!
-आमदार-खासदार निवडून आले की कोल्हापूरला… पूर येऊन 5 दिवस झालं तरी ठाकरे ‘मातोश्री’तच!
-साईबाबा संस्थान पूरग्रस्तांच्या मदतीला, दिला 10 कोटींचा निधी
-“खरंच राजं आहात तुम्ही… तुमच्या रूपात आम्हाला छत्रपती शिवराय दिसले”
Comments are closed.