Maharashtra l केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते बालेवाडी, पुणे (Balewadi, Pune) येथे पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले.
महाराष्ट्राला विक्रमी 20 लाख घरे :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, “या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला 13.57 लाख घरे मिळाली होती, त्यातील 12.65 लाख घरे पूर्ण झाली असून उर्वरित काम सुरू आहे.”
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी फक्त 45 दिवसांत 10 लाख घरांचा पहिला हप्ता वितरित केल्याबद्दल राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अभिनंदन करण्यात आले. अनुदानात वाढ, मोफत सौरऊर्जा योजना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, घरांसाठीचे अनुदान 1.60 लाखांवरून 2 लाखांपेक्षा जास्त करण्यात आले आहे.
योजनेतील लाभार्थ्यांना मोफत सौरऊर्जा दिली जाणार असून, त्यांना आजीवन मोफत वीज मिळणार आहे. एकूण 51 लाख घरे आणि 1 लाख कोटींची गुंतवणूक फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा-1 आणि 2 अंतर्गत 33.57 लाख घरे रमाई, शबरी, पारधी, अहिल्या, अटल बांधकाम कामगार योजना आणि ओबीसींसाठी मोदी आवास योजना मिळून 17 लाख घरे एकूण 51 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट या योजनांसाठी 70,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, सोलर अनुदानासह हा निधी 1 लाख कोटींवर जाईल.
“20 लाख घरे हे फक्त सुरुवात आहे” :
अमित शाह म्हणाले, “भारताच्या इतिहासात प्रथमच एका राज्यात एकाच वेळी 20 लाख घरांचे वाटप होत आहे.” घरांसोबत शौचालये आणि सौर पॅनेल पुरवले जातील. लवकरच लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देखील मिळणार आहेत.