खेळ

पीएम केअर फंडला भरभरुन मदत; मात्र त्याबद्दल माहिती द्यायला पीएमओचा नकार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाग्रस्तांकरता मदत म्हणून पंतप्रधान नागरिक सहाय्यता आणि आपात्कालीन फंड अर्थात पीएम-केअर्स फंडाची घोषणा केली आहे. तसेच लोकांनी देशवासीयांसाठी पैसे दान करावेत, असं आवाहन त्यांनी केलं होतं. या पीएम केअर फंडला लोकांनी भरभरुन मदत देखील केली आहे. मात्र आता पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती देण्यास नकार दिल्याचं कळतंय.

1 एप्रिलला श्रीहर्ष कंदकुरी नावाच्या व्यक्तीने आरटीआयला विनंती केली होती की फंडशी संबंधित ट्रस्टची कागदपत्रे तसेच फंडला चालवण्यासाठी दिलेले सरकारी आदेश, अधिसुचना याबाबत माहिती देण्यात यावी. 30 दिवसांनतर त्यांना पीएमओकडून उत्तर मिळालं.

पीएम केअर फंड हा माहिती अधिकार कायदा 200, च्या कलम 2 (ह) अंतर्गत सार्वजनिक अधिकार नाही. असं असलं तरी पीएम केअर फंडाशी संबंधित महत्वाची माहिती त्याच्या वेबसाइट pmcares.gov.in वर जाऊन पाहु शकता, असं पीएमओने म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलीफ फंड तसंच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोश असताना नव्या फंडाची आवश्यकता का? असा सवाल विरोधकांनी विचारला होता. तसेच काही दिवसांपूर्वी पीएम केअर फंडासाठी भाजप नेत्यांनी मदत मागताना फेक वेबसाईट दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

“पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरलं, मग आताच कसं पडेल?”

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं नाशिकमधील शेतकऱ्याचं कौतुक!

लॉकडाऊन शिथीलतेनंतर चिंतेत भर, देशात गेल्या 24 तासांतला कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या