Farmer scheme l केंद्र सरकारने देशातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी एक महत्त्वाची पावले उचलली असून, ‘पीएम धन धान्य योजना’ येत्या जून 2025 पासून अंमलात येण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा आणि साधनांची मदत मिळणार आहे. योजनेची अंमलबजावणी 100 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार असून, त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
अल्प उत्पादन क्षेत्रांना मिळणार विशेष लाभ :
2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेसाठी विशेष तरतूद जाहीर केली होती. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत माहिती दिली की, देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादन क्षमतेत तफावत आहे. या योजनेच्या माध्यमातून 1.6 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून, उत्पादनात वाढ करण्याचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेत सिंचन व्यवस्था, सौर पंप, बोरवेल्स, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान, तसेच वीजपुरवठा सुधारणा अशा विविध गोष्टींचा समावेश असेल. शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या माध्यमातून कमी उत्पादन करणाऱ्या भागांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न आहे.
Farmer scheme l योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर :
सध्या कोणते 100 जिल्हे योजनेत सामील होणार हे जाहीर करण्यात आलेलं नसले तरी, कृषी तज्ज्ञांच्या मते, ही योजना शेतीच्या उत्पादनक्षमतेत मोठा फरक घडवू शकते.
मात्र, केवळ घोषणा पुरेशा नाहीत, तर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे, हे तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.