चार्जिंगचं टेन्शन विसरा, आता बिनधास्त घ्या ई-कार; सरकारची मोठी घोषणा

PM E-Drive New charging stations in 15 months

PM E-Drive New charging stations | इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम-ई-ड्राइव्ह’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पुढील 15 महिन्यांत देशभरातील 40 शहरांमध्ये तब्बल 72 हजार नवीन फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारचा या महत्वाकांक्षी ‘पीएम-ई-ड्राइव्ह’ उपक्रमामुळे ई-वाहनांना चालना मिळणार आहे. (PM E-Drive New charging stations)

चार्जिंग स्टेशनचा अभाव दूर होणार

देशात सध्या चार्जिंग स्टेशनची संख्या कमी असल्याने अनेक नागरिक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास मागे हटत आहेत. मात्र, सरकारच्या या योजनेमुळे ही समस्या दूर होणार असून, ई-वाहनांच्या वापराला चालना मिळणार आहे.

राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना

या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार राज्यांना फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. राज्य सरकारे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने स्टेशनसाठी जागा निश्चित करतील आणि इतर नियम आखतील. (PM E-Drive New charging stations )

केंद्र सरकारकडून अनुदान

या योजनेअंतर्गत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. यासाठी २,००० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये या योजनेची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. ही योजना मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. (PM E-Drive New charging stations)

कोणत्या शहरांमध्ये उभारणार चार्जिंग स्टेशन?

पहिल्या टप्प्यात नवी दिल्ली, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, लखनऊ, कानपूर, इंदूर, लुधियाना, पाटणा, भोपाळ, चंडीगड, रायपूर, नागपूर, देहरादून या शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या शहरांमध्ये ई-वाहनांचा वापर वाढला आहे.  (PM E-Drive New charging stations)

ई-वाहनांना चालना

देशात दुचाकींच्या विक्रीत इलेक्ट्रिक बाइकचा वाटा १० टक्के इतका आहे, तर २०२३ च्या तुलनेत इलेक्ट्रिक कारविक्री २० टक्के वाढली आहे. सरकारच्या या योजनेमुळे ई-वाहनांच्या वापराला आणखी चालना मिळेल, असा विश्वास आहे. (PM E-Drive New charging stations)

News Title : PM E-Drive New charging stations in 15 months
महत्वाच्या बातम्या – 

बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पात्रता फेरीतील धक्कादायक प्रकार उघडकीस

मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकऱ्यांसाठी आले कांद्याचे नवे वाण, फक्त ‘इतक्या’ दिवसात निघणार उत्पादन!

सूर्यवंशी कुटुंबाने 10 लाख रुपये नाकारले, राज्य सरकारला मोठी चपराक

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .