PM Kisan Yojana l केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवते. अशातच एक सर्वात महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये करत असते. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या हत्यावर जमा झाले आहेत.
ई-केवीआयसी करणे अनिवार्य :
केंद्र सरकारने नुकतंच 18 वा हप्त्याचे वितरण केले आहे. याअंतर्गत देशातील तब्बल 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात तब्ब्ल 20,000 कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. मात्र शेतकऱ्यांना 18 वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवीआयसी (e-KYC) करणे अनिवार्य असणार आहे. तसेच बँक खाते आधारसोबत लिंक असणे देखील आवश्यक आहे.
याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असेल त्यांना 18 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 18 वा हप्ता जमा झाला नसेल किंवा 2 हजार रुपये जमा झाले नसतील तर सर्वात पहिल्यांदा तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे चेक करणे गरजेचे आहे.
PM Kisan Yojana l या हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार :
तुमच्या खात्याचे स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा pmkisan.gov.in या साईटवर जाऊन “Farmers Corner” या ऑप्शनवर क्लीक करून “Beneficiary Status” या बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा. तसेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Get Data या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या खात्याचे स्टेट्स तुम्हाला दिसेल.
परंतु काही चूक झाली असल्यास अथवा हप्ता जमा न झाल्यास शेतकरी थेट तक्रार करू शकतात. त्यासाठी शेतकरी 155261 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 1800115526 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. याशिवाय शेतकरी pmkisan-ict@gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवू शकतात.
News Title – PM Kisan 18th installment 2024
महत्त्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसची गरजू महिलांसाठी मोठी घोषणा!
गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला?; आज होणार निकाल जाहीर
मुंबई म्हाडाच्या 2030 घरांची आज सोडत, घर मिळालं की नाही ते ‘असं’ करा चेक
नवरात्रीचा आज सहावा दिवस, देवी कात्यायनी ‘या’ राशींवर धरणार कृपेचे छत्र!