Mobile Number Update | PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या व्यक्तिगत माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा दिली जाते. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल, तर तो लवकरात लवकर अपडेट करणे गरजेचे आहे. (Mobile Number Update)
मोबाईल नंबर अपडेट नसल्यास हप्त्याचे पैसे येण्यात अडचण निर्माण होऊ शकते. चांगली बाब म्हणजे, आधार कार्डशिवायही तुम्ही घरबसल्या मोबाईल नंबर बदलू शकता.
मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया
PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहजपणे तुमचा नंबर अपडेट करू शकता.
- सर्वप्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- “Farmers Corner” या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर “Update Mobile Number” या पर्यायावर क्लिक करा.
- येथे रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक यापैकी एक पर्याय निवडा.
- जर तुमच्याकडे आधार क्रमांक नसेल, तर रजिस्ट्रेशन नंबरद्वारे पुढे जा.
- कॅप्चा कोड टाका आणि “Edit” ऑप्शनवर क्लिक करून नवीन मोबाईल नंबर नोंदवा.
PM किसानच्या 20व्या हप्त्याची तारीख कशी तपासाल?
PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- PM किसान अधिकृत वेबसाईटवर जा.
- होमपेजवरील “PM Kisan Installment Date” पर्यायावर क्लिक करा.
- नवीन विंडो उघडल्यावर आवश्यक माहिती भरा.
- Submit बटणावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला 20व्या हप्त्याची तारीख दिसेल.
PM किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. याचा पहिला लाभ बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला. या योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9.08 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती.
Title : PM Kisan Mobile Number Update steps