PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) हा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु त्यापूर्वी, शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) आणि जमिनीची पडताळणी करणे बंधनकारक आहे. (PM Kisan)
या योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने काही नियम अधिक कठोर केले आहेत. जे शेतकरी ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणार नाहीत, त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सरकारने अशा शेतकऱ्यांना त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
अपात्र व्यक्तींकडून योजनेचा गैरफायदा
विशेष म्हणजे, या योजनेचा काही अपात्र व्यक्तींनी गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी सरकारला मिळाल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पडताळणी प्रक्रिया अधिक कडक केली आहे. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत, परंतु तरीही लाभ घेत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. त्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांनीच लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
ई-केवायसी कसे करावे?
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर ते करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा PM किसान पोर्टल/अॅपद्वारे ऑनलाइन ई-केवायसी करता येईल. (PM Kisan)
देशभरातील कोट्यवधी शेतकरी १९ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, ई-केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण न केल्यास हा हप्ता बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय या योजनेचा लाभ घेता येईल.
Title : PM Kisan samman nidhi 19th installment on february 24 complete e kyc land verification