पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार?

PM Kisan Yojana | भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारत सरकारही शेतकऱ्यांना भरपूर सवलती देते. भारत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना चालवल्या जातात, ज्यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. यापैकी एक योजना सर्वात मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते. हे पैसे सरकार प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये देते. आतापर्यंत एकूण 16 हप्ते जारी करण्यात आले आहेत. अशातच आता शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्यापूर्वी, किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आला आहे का? हे जाणून घेऊयात…

PM Kisan Yojana | कोणतेही नियम बदललेले नाहीत :

किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे. असा प्रश्न मग शेतकऱ्यांना पडला आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाली आहे आणि ज्यांची खाती आधारशी लिंक आहेत. तसेच ज्यांनी सर्व कागदपत्रे पूर्ण केली आहेत. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. भारतातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांना सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुरविलेल्या आर्थिक रकमेचा अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. त्यामुळे अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. सध्या शेतकरी 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 28 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेचा 16 वा हप्ता सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला आहे. अशातच आता या योजनेचा 17वा हप्ता वर्ष अखेरीस येईल असा अंदाज आहे.

पीएम किसान योजनेसंदर्भात अडचणी असल्यास ‘या’ वेबईतला भेट द्या :

कोणताही लाभार्थी किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची स्थिती ऑनलाइन तपासू शकतो. यासाठी सर्वात आधी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला Know Your Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. जिथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.

त्यानंतर कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर Get OTP वर क्लिक करा. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. त्यात प्रवेश केल्यानंतर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याची स्थिती तुमच्या समोर येईल.

News Title – PM Kisan Samman Nidhi Yojana 17th Installment

महत्त्वाच्या बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला दिला सर्वात मोठा धक्का

‘या’ तीन राशींच्या कुंडलीत होणार मोठे बदल

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश?, छगन भुजबळांची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले..

सेल्फीच्या नादात नवविवाहितेने गमावला जीव; किल्ल्यावरून थेट..

“मराठीत बोलली म्हणून थेट धमकी..”; अभिनेत्रीने सांगितला लोकलमधील धक्कादायक अनुभव