आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही!

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana l केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial Aid) करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य आर्थिक पातळीवर सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना (Schemes) राबवत आहेत. यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेअंतर्गत, भारत सरकार (Indian Government) देशातील गरीब शेतकऱ्यांना (Poor Farmers) दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे. आज देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

आत्तापर्यंत १८ हप्ते वितरीत :

आतापर्यंत सरकारने या योजनेचे एकूण १८ हप्ते वितरीत केले आहेत. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील (Maharashtra) वाशिम (Washim) जिल्ह्यात या योजनेचा हप्ता वितरित केला होता. आता केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या नियमावलीत (Rules and Regulations) बदल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा (Official Announcement) करण्यात आलेली नाही.

PM Kisan Yojana l काय आहेत नवीन नियम?

कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ (Benefit to only one member of the family): केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य (Mandatory): योजनेसाठी अर्ज (Application) करताना पती (Husband), पत्नी (Wife) आणि मुलांचे (Children) आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

आयकर (Income Tax) भरणारे अपात्र (Ineligible): नवीन नियमानुसार जे लोक आयकर भरतात त्यांना या योजनेतून वगळण्यात (Exclude) आले आहे.

अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार :

या योजनेची सुरुवात झाली तेव्हा एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, सरकारच्या नवीन नियमांमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

Title : PM Kisan Samman Nidhi Yojana: Changes in the rules, know the details

महत्वाच्या बातम्या- 

महायुती सरकारचा लाडक्या बहिणींना पहिला मोठा धक्का!

‘त्या रात्री त्याने…’; करीना कपूरच्या जबाबातून धक्कादायक खुलासा समोर

‘सैफ अरे तू इतका करोडपती आहेस, मग…’; राखीचा सैफ अली खानला सल्ला

शुद्धीवर आल्यावर सैफने सर्वात पहिले डॉक्टरांना विचारला ‘हा’ प्रश्न

फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला अर्धवट अवस्थेतील मृतदेह

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .