पीएम किसान योजनेत मोठा बदल, जाणून घ्या नवीन नियम

PM Kisan Samman Nidhi Yojana new rules

PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana), शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक (Farmer ID) आता अनिवार्य करण्यात आला आहे. हप्त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार (Aadhaar) लिंक (Link) करावे लागणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत, महाराष्ट्र सरकारच्या अ‍ॅग्रीस्टॅक (AgriStack) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. पीएम किसानच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक जोडणे अनिवार्य असेल. यासोबतच शेतकरी ओळख क्रमांकाची अट देखील लागू करण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात (CSC Center) जाऊन शेतकरी ओळख क्रमांक मिळवू शकता.

नवीन अट काय आहे?

पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी वितरीत केला जाणार आहे. या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू होणार नाही. मात्र, २० व्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र बंधनकारक होणार आहे. तथापि, नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, पती-पत्नी आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नियमांचे पालन केले नाही तर पीएम किसानचे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही. (PM Kisan Samman Nidhi Yojana)

शेतकऱ्यांची संख्या, ई-केवायसी आणि आधार लिंकिंगची स्थिती

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आतापर्यंत ९६ लाख ६७ हजार पात्र लाभार्थी आहेत.
यापैकी ९५ लाख ९५ हजार लाभार्थींची नोंदणी जमिनीच्या नोंदीनुसार झाली आहे.
७८ हजार लाभार्थ्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत.
९५ लाख १६ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.
१ लाख ८९ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही.
९४ लाख ५५ हजार लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी जोडले आहे.
१ लाख ९८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी आधार जोडलेले नाही. (PM Kisan Samman Nidhi Yojana)

Title: PM Kisan Samman Nidhi Yojana new rules farmer id and aadhaar linking mandatory

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .