PM Kisan Yojana l शेतकरीवर्ग केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याची वात पाहत आहेत. या योजनेचे आत्तापर्यंत एकूण 17 हप्ते जमा झाले आहेत. मात्र पीएम किसान योजनेच्या यादीत नाव असूनही या योजनेशी संबंधित आवश्यक अटींची पूर्तता न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकार योजनेशी संबंधित सर्व अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातच हप्त्याची रक्कम जमा करत आहे. तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर जाणून घ्या त्या महत्त्वाच्या अटी.
जमिनीची पडताळणी पूर्ण करणे बंधनकारक :
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया दीर्घ काळापासून अनिवार्य केली आहे. यासोबतच जमिनीची पडताळणी पूर्ण करणेही बंधनकारक आहे. या अटींची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही ही कामे अजून पूर्ण केली नसतील तर आजच करा.
शेतकऱ्यांना ई-केवायसी ऑफलाइन पद्धतीने देखील करता आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना लक्षात ठेवा की तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
PM Kisan Yojana l अशाप्रकारे करा ऑनलाईन e-KYC :
– यासाठी सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– पुढे, होम पेजवर जा आणि शेतकरी कॉर्नर विभागात e-KYC चा पर्याय निवडा.
– ई-केवायसी पृष्ठावर जा आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.
– यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
– यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
– तिथे नंबर टाकताच तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो इथे टाका.
– OTP एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
– यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
– हा संदेश तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल
News Title – PM Kisan Yojana 18th Installment
महत्त्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीस…’हा’ बडा नेता स्वतःच्या अटकेची वाट पाहतोय
‘संकेत बावनकुळेसह मित्र…’; नागपूर हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर
विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी
सोलापूरात भाजपला खिंडार?; तब्बल ‘इतके’ नेते शरद पवार गटात जाणार?
खुशखबर! आयफोन झाले स्वस्त; जाणून घ्या किंमती