PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana) राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 18 वा हप्ता कधी मिळणार याची सध्या शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. आता याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. (PM Kisan Yojana)
आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. 18वा हप्ताही पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो. यापूर्वी शेतकऱ्यांना काही सुचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना 18 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाहीत.
ई-केवायसी कशी करणार?
शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान मोबाइल ॲपमध्ये ‘फेस ऑथेंटिकेशन फीचर’ उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने शेतकरी घरी बसल्या ई-केवायसी करू शकतात. OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करता येते.
याशिवाय शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी देखील करू शकतात. जर शेतकरी स्वत: OTP द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असेल, तर ते विनामूल्य आहे. पुढच्या महिन्यात 18 व्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात. त्यामुळे आता लगेच शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी.अन्यथा त्यांना लाभ मिळणार नाही. (PM Kisan Yojana)
पैसे जमा झाले की नाही ते कसे तपासणार?
– सर्वप्रथम पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
– या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
– या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
– आता खालील कॅप्चा कोड (PM Kisan ) टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
– त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
– ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल. (PM Kisan Yojana)
लाभार्थी यादीतील नाव कसे तपासायचे?
– सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
– लॉग इन केल्यानंतर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
– त्यानंतर वरच्या उजव्या बाजूला (PM Kisan ) असलेल्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी 2024 वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला एका नवीन वेबपेजवर रीडायरेक्ट केले जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीतील तुमचं नाव तपासता येईल. (PM Kisan Yojana)
News Title – PM Kisan Yojana 18th Installment 2024 Date
महत्त्वाच्या बातम्या-
10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करणार?
मलायकाच्या वडिलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; मिळाली धक्कादायक माहिती
झिका व्हायरस वेगाने फोफावतोय; मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंची बारी?, शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत
राज्यात पुन्हा मविआची सत्ता येणार, 180 जागा जिंकणार; कुणी केला दावा?