शेतकऱ्यांनो PM किसान योजनेचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana) राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 18 वा हप्ता कधी मिळणार याची सध्या शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. आता याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. (PM Kisan Yojana)

आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरला दिली जाणार आहे. मात्र, यापूर्वी शेतकऱ्यांना काही सुचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना 18 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे त्वरित ही प्रक्रिया करून घ्यावी, अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

ई-केवायसी कशी करणार?

शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान मोबाइल ॲपमध्ये ‘फेस ऑथेंटिकेशन फीचर’ उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने शेतकरी घरी बसल्या ई-केवायसी करू शकतात. OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करता येते.

याशिवाय शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी देखील करू शकतात. जर शेतकरी स्वत: OTP द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असेल, तर ते विनामूल्य आहे. पुढच्या महिन्यात 18 व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. त्यामुळे आता लगेच शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी.अन्यथा त्यांना लाभ मिळणार नाही. (PM Kisan Yojana)

पैसे जमा झाले की नाही ते कसे तपासणार?

– सर्वप्रथम पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
– या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
– या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
– आता खालील कॅप्चा कोड (PM Kisan ) टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
– त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
– ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल. (PM Kisan Yojana)

News Title – PM Kisan Yojana 18th Installment  Date Announced

महत्त्वाच्या बातम्या-

अबब! सोनं पोहोचलं 80 हजारांवर?, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड

‘बदला पुरा’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी फडणवीसांचं रोखठोक भाष्य!

धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार

‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा शोषणाचे आरोप, ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका

भाजपकडून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?, ‘या’ नेत्याला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी