शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

PM Kisan Yojana 19th Installment  

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana) राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता 19 वा हप्ता कधी मिळणार याची सध्या शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. आता याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. (PM Kisan Yojana)

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक 6000 दिले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, 19 व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात.

पैसे जमा झाले की नाही ते कसे तपासणार?

– सर्वप्रथम पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
– या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
– या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
– आता खालील कॅप्चा कोड (PM Kisan ) टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
– त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
– ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल. (PM Kisan Yojana)

लाभार्थी यादीतील नाव कसे तपासायचे?

– सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
– लॉग इन केल्यानंतर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
– त्यानंतर वरच्या उजव्या बाजूला (PM Kisan ) असलेल्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी 2024 वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला एका नवीन वेबपेजवर रीडायरेक्ट केले जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीतील तुमचं नाव तपासता येईल. (PM Kisan Yojana)

News Title – PM Kisan Yojana 19th Installment  

महत्त्वाच्या बातम्या-

शपथविधिला काही तास बाकी असताना अजित पवारांचं मोठं स्टेटमेंट, चर्चांना उधाण!

अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न यंदाही अपूर्णच, मात्र केला ‘हा’ नवा रेकॉर्ड!

एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार?; ‘या’ बड्या नेत्याने सस्पेन्स संपवला

शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन, चर्चेला उधाण

‘या’ तारखेला होणार 33 मंत्र्याचा शपथविधी, कोणाला किती मंत्रिपदं मिळणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .