शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये न आल्यास ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार!

PM kisan Yojana l शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन महिन्यांनी 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.

पीएम शेतकरी सन्मान निधीचा 17 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा :

अशातच आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत काल देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा 17 वा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान देखील व्यक्त केले जात आहे.

मात्र अशातच काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्याप 2000 रुपये आले नाहीत असे शेतकरी थेट पीएम शेतकरी सन्मान निधीचे काम पाहणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार देखील करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेसंदर्भात काही अडचणी असल्यास त्याच्या थेट समस्या सोडवल्या जाऊ शकतात.

PM kisan Yojana l या हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार :

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या ज्या समस्या आहेत त्या शेतकरीवर्ग pmkisan-ict@gov.in. आणि pmkisan-funds@gov.in या अधिकृत मेल आयडींवर देखील तक्रार करू शकतात. याशिवाय केंद्र सरकारने पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतर्फे एक हेल्पलाईन नंबर देखील जारी केलेला आहे.

शेतकरीवर्ग 011-24300606, 155261 या हेल्पलाईन नंबरवर देखील थेट तक्रार दाखल करू शकतात. याशिवाय शेतकरी 1800-115-526 या टोल फ्री नंबरवर देखील शेतकरी आपली तक्रार दाखल करू शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आले नाहीत त्यांनी तक्रार करावी.

News Title : PM kisan Yojana Helpline Number

महत्त्वाच्या बातम्या

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रान पेटवणार; लक्ष्मण हाके निर्णय घेणार?

सोनाक्षी-झहीरचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू! ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

छगन भुजबळ अजितदादांना धोका देऊन शरद पवार गटात जाणार का? भुजबळांनी दिल रोखठोक उत्तर

येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा; कुठे बरसणार मुसळधार पाऊस?

आज या राशीचे व्यक्ती मोठा निर्णय घेतील! पण कोणासाठी?