बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेतील तिसरा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर

नवी दिल्ली | केंद्र सरकार दरवर्शी पीएम किसान योजनेअंतर्गत (PM kisan sanman nidhi yojana) शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा करतं. यातील तिसरा हप्ता दरवर्षी डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. मात्र, यंदा हा हप्ता मिळण्यास उशीर होणार आहे, तिसऱ्या हप्ता मिळण्याची तारीख व इतर सर्व माहिती केंद्र सरकारच्या National Center Of Geo-Informatics या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांना दर 4 महिन्याच्या अंतरानं 2 हजार रुपये दिले जातात. दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला हप्ता, ऑगस्टमध्ये दुसरा हप्ता तर डेिसेंबरमध्ये तिसरा हप्ता दिला जातो. यानुसार दरवर्षी 6 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, यावर्षी तिसरा हप्ता डिसेंबरमध्ये नाही तर पुढील वर्षीच्या जानेवारीमध्ये मिळणार आहे.

डिसेंबरमध्ये मिळणारा हप्ता आता 1 जानवारी 2022 या तारखेस मिळणार आहे. याशिवाय आणखी एक बदल या योजनेत करण्यात आला आहे. तो म्हणजे आता शेतकऱ्यांना e-KYC  म्हणजेच Electronic Know Your client करून घ्यावी लागणारं आहे. यासाठी तुम्हाला Pmkisan.gov.in या वेबसाईटची मदत घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत e-KYC केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना यावर्षीचा तिसरा हप्ता मिळणार का? अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर यावर्षी सर्व शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळणार आहे. मात्र, 2022 पासून शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळवण्यासाठी e-KYC करून घेणं, अनिवार्य असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

सचिनने ‘तो’ प्रश्न विचारला अन् माझी झोपच उडाली; रणवीर सिंगने सांगितला किस्सा

रावते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”; अजित पवारांनी मागे वळून पाहिलं अन्…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत, एका ट्विटनं उडाली खळबळ

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात कडक लाॅकडाऊन लागू

प्रियांका-निकचा घटस्फोट?; अखेर प्रियांकाने सोडलं मौन, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More