Marathi Sahitya Sammelan l नवी दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) भव्य प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. या संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhavalkar) यांनी भूषवले असून, स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.
साहित्य संमेलनात मोदी-पवार एकाच व्यासपीठावर :
या संमेलनात पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यांच्या उपस्थितीने संमेलनाला वेगळीच राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्वाची छटा मिळाली. संमेलनाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कृतीने उपस्थितांचे मन जिंकले.
शरद पवार यांचे भाषण संपल्यानंतर ते त्यांच्या खुर्चीकडे परत जात असताना, पंतप्रधान मोदींनी पुढे येऊन त्यांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केली. तसेच, स्वतः बाटलीतील पाणी ग्लासात ओतून पवारांना दिले. मोदींच्या या विनम्र कृतीने संमेलनातील उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. दीपप्रज्वलनावेळीही मोदींनी शरद पवारांना सन्मानपूर्वक पुढे येण्यास सांगितले आणि दोघांनी एकमेकांचा हात धरलेला दिसला.
Marathi Sahitya Sammelan l पंतप्रधान मोदींचे मराठीत भाषण :
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून संवाद साधत उपस्थितांची वाहवा मिळवली. ते म्हणाले, “आज जागतिक मातृभाषा दिवस आहे आणि तुम्ही साहित्य संमेलनासाठी उत्तम दिवस निवडला आहे. मराठी भाषा अमृताहून गोड असल्याचे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे.”
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi and NCP chief Sharad Pawar at the inauguration of the 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan.
(Source: DD News) pic.twitter.com/W2TJpqyeqv
— ANI (@ANI) February 21, 2025
ते पुढे म्हणाले, “मराठी भाषेबद्दल माझं विशेष प्रेम आहे. मी अनेकदा मराठी शिकण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील या साहित्य संमेलनाला माझा नमस्कार.”
यावेळी त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषणाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “त्यांचे भाषण ऐकल्यावर मी त्यांचे कौतुक केले, तर त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिले की, त्यांनाही गुजराती भाषा आवडते.”