नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुसऱ्यांदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित करत आहेत. जनता कर्फ्यूला सगळ्या देशवासियांनी सफल केलं. त्यांच्या उस्फूर्त सहभागाने जनता कर्फ्यू यशस्वी झाला. तसंच देशावर संकट आल्यावर सगळे एकत्र येतात, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग आहे. या रोगाला हरवण्याचा विलगीकरण हाच एकमेव उपाय आहे. सामान्यांपासून पंतप्रधालादेखील हाच उपाय असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
काही लोकांचा निष्काळजीपणा हा घातक ठरेल. याची खूप मोठी किंंमत भारताला चुकवावी लागेल, असा इशारा मोदींनी यावेळी दिला. तसंच सर्व प्रगत देशांमध्ये आव्हान वाढत चाललं आहे. त्यामुळे आपण सतर्कता बाळगायला हवी, असं ते म्हणाले.
दरम्यान, संपूर्ण देशामध्ये आज रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. एकप्रकारे हा कर्फ्यूच असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं,
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल
उद्धव ठाकरेंचा संयमीपणा… राज्यातील नागरिक, पोलिस तसंच केंद्र शासनाचे मानले आभार!
‘गो करोनिया गो’…. पाहा विनोदवीर कुशल बद्रिकेचं भन्नाट गाणं
Comments are closed.