मोदींनी पंतप्रधानपदाचा स्विकार करताच शेतकऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल!

PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे देशाचे सलग तिसरे पंतप्रधान झाले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी (PM Modi) हे देशाचे सलग तिसरे पंतप्रधान झाले आहेत. मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारताच शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचचलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

मोदींच्या एका सहीमुळे 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

पीएम किसान योजनेच्या अधिकृत फाईलवर मोदींनी स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा आता 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यामाध्यमातून सुमारे 20,000 कोटी रूपयांचं वितरण होणार आहे. मोदी सरकारवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवर रोष असल्याचं दिसून आलं आहे. तसेच दिल्लीतही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं तेव्हा मोदींनी पाठ फिरवली होती. (PM Modi)

फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले, “किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी संबंधित आहे. आम्हाला पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे. आम्ही येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी इतरही भरपूर कामं करत राहू”, असं मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची रविवारी शपथ घेतली. हा नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ आहे. पहिल्या दोन टर्ममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत होतं. यावेळी पक्षाला बहुमत प्राप्त करण्यासाठी अपयश आल्याचं दिसून आलं आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी सत्तस्थापनेसाठी मोदींना पाठिंबा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

400 पारचा नारा फेल

भाजपने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला. मात्र भाजपला 300 पर्यंत देखील पोहोचता आलं नाही. अनेक राज्यामध्ये पक्षाला मोठा फटका बसला होता. महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या अनेक जागा कमी झाल्या तरीही दुसरीकडे महाविकास आघाडीने मुंसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

महाविकास आघाडीने राज्यात 30 तर महायुतीने राज्यात 17 जागा मिळवल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीने राज्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

News Title – PM Modi Big Decision For Indian Farmers After Third Time NDA Government

महत्त्वाच्या बातम्या

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार करताय? मग ‘या’ गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

बुलेट लव्हर्ससाठी खुशखबर; रॉयल एनफिल्डच्या या बाईक लवकरच लाँच होणार

राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; शरद पवार सरप्राईज देणार?

नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शपथ; जाणून घ्या एका क्लिकवर

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्वाचा इशारा