बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 497 दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 27 मार्चला मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि बांग्लादेशच्या राजकीय मैत्रीला आता 50 वर्ष पुर्ण होत आहेत. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी हा दौरा करण्याचं निश्चित केल्याचं समजतंय.

देशावर आलेल्या कोरोनासंकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहीलाच परदेश दौरा असणार आहे. भारताकडुन इतर देशांना पाठविण्यात आलेल्या कोरोना लसीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 90 लाख कोरोना लसीचे डोस एकट्या बांग्लादेशला पुरवण्यात आले आहेत. बांग्लादेशची राजधानी ढाका ते बंगाल दरम्यान प्रवासी रेल्वेला मोदी हिरवा कंदील देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डिसेंबरमध्ये बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन मिटींगनंतर मोदींनी बांग्लादेश दौरा करणार असल्याचं घोषित केलं होतं. भारताच्या नेबरहुड फर्स्ट अॅंड अॅक्ट ईस्ट या पाॅलिसीनुसार भारत आणि बांग्लादेशचे संबंध पुर्वीपेक्षा अधिक मैत्रीपुर्ण व मजबुत झालेले आहे.

कोरोनाचं संकट देशावर घोंगावत असताना संपूर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहील्यांदाच परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यापुर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील दौऱ्यावर गेले होते. तो दौरा त्यांचा कोरोनापुर्वीचा शेवटचा दौरा होता.

थोडक्यात बातम्या-

कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकतं स्वस्त’; SBI च्या अर्थतज्ज्ञांनी सुचवला ‘हा’ पर्याय

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द खरा करून दाखवला

वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; सावत्र बापाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

पोलीस असल्याचं सांगून ठेवले शारीरिक संबंध, चौकशी केल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More