Pm Modi Hat-trick | आज देशभरासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. अनेकांच्या नजरा या मतमोजणीकडे लागल्या आहेत. ही लढाई केवळ उमेदवारांची, तसेच पंतप्रधान पदाची नसून लोकशाहीची लढाई आहे. याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच आता थेट देशातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रामलल्लाच्या मुख्य पुजाऱ्याने लोकसभा निवडणुकीविषयी मोठं भाकीत केलं आहे. (Pm Modi Hat-trick)
राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचं मोठं भाकीत
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालापूर्वी उत्तरप्रदेशातील आयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मुख्य पुजाऱ्याने मोठं भाकीत केलं आहे. आचार्य सत्येंद्र दास असं त्यांचं नाव आहे. आचार्य सत्येंद्र दास यांच्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभू श्रीराम यांची मोठी कृपा आहे. यामुळे आता मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. (Pm Modi Hat-trick)
“मोदी विजयाची हॅट-ट्रिक करणार”
आज 4 जून निकालाचा दिवस आहे. यावर आता पुजारी म्हणाले की मतदानादिवशीच समजणार आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या विजयाची हॅट्रिक (Pm Modi Hat-trick) करणार आहेत. प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर श्रीरामाची कृपा आहे.
त्यानंतर पुन्हा आचार्य म्हणाले की, आम्हीही भाजपची पुन्हा एकदा सत्ता यावी यासाठी प्रभू श्रीरामाच्या चरणी लीन होत आहे. मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे यासाठी प्रार्थना करत असताना दिसत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. अनेक एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
News Titlke – Pm Modi Hat-trick In Loksabha Election Ram Mandir Chief Priest Acharya Satyendra Das Big Statement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावतीतून मोठी बातमी समोर; नवनीत राणांवर कॉँग्रेसची आघाडी
अहमदनगरमधून मोठी अपडेट्स समोर; पाहा कोण आघाडीवर?
राज्यातील 10 हायव्होल्टेज लढती, कोण मारणार बाजी?
शेअर बाजारात मोठी उलथापालथ; निकालापूर्वीच मार्केट जोरदार आपटलं