राज्य सरकारने कथित गोरक्षकांचा बंदोबस्त करावा- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | गोरक्षणाच्या नावाखाली वैयक्तिक दुश्मनी काढणारांवर राज्य सरकारनं लक्ष ठेवायला हवं, तसेच अशा प्रकारच्या घटना प्रत्येक राज्य सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हव्यात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत ते बोलत होते.

गोमातेचं संरक्षण गरजेचं आहे. पण त्यासाठी कायदा आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या