पंतप्रधान मोदी आज मुंबईत, ‘असा’ असणार संपूर्ण दौरा!

PM Modi in Mumbai

PM Modi in Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 15 जानेवारीरोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आज महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच, मोदींच्या हस्ते दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे राष्ट्रार्पण होणार आहे. त्यानंतर मोदी महायुतीच्या सर्व मंत्री आणि आमदारांची भेट घेतील. दोन तासांच्या या भेटीसाठी सर्व मंत्री, आमदारांना उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. (PM Modi in Mumbai )

5 डिसेंबररोजी महायुती सरकारच्या शपथविधीसाठी मोदी मुंबईत आले होते. यानंतर ते आता दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात आज पंतप्रधान भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

‘असा’ असणार मोदींचा दौरा-

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सकाळी 10.30 च्या सुमारास आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण होईल. यानंतर महायुतीचे मंत्री आणि आमदारांना ते मार्गदर्शन करतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोदी मंत्र्यांसह आमदारांना काय कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तसेच दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन देखील होणार आहे. (PM Modi in Mumbai )

वाहतुकीत मोठे बदल-

  • -मोदींच्या दौऱ्यानिमित्त आज ओवे गाव पोलीस स्थानक ते जे कुमार सर्कल आणि ग्रीन हेरीटेज येथे दोन्ही मार्गांनी वाहनांच्या प्रवेशास मनाई असेल.
  • प्रशांत कॉर्नरच्या दिशेनं ओवे गाव येथे जाणाऱ्या वाहनांनी जे कुमार सर्कलहून डावं वळण घेऊन इच्छुक स्थळी जावे.
  • ओवे गावहून जे कुमार सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी प्रशांत कॉर्नर येथून उजवं वळण घेऊन इच्छुक स्थळी जावे.
  • शिल्प चौकातून जे कुमार सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी ग्रीन हेरिटेज सर्कलपाशी पोहोचून त्यानंतरचे वळण घ्यावे.
  • ग्राम विकास भवनहून येणाऱ्या वाहनांनी ग्रीन हेरिटेज चौक येथे डावं वळण घेत बीडी सोमाणी शाळेपासून सरळ प्रवास करावा.
  • विनायक शेठ चौकातून बी डी सोमाणी शाळेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी शाळेच्या चौकातून उजवं वळण घेत पुढील प्रवास करावा. (PM Modi in Mumbai )

News Title :  PM Modi in Mumbai

महत्वाच्या बातम्या-

किंक्रांत! आज ‘या’ राशींनी राहावे सावध, वाचा बुधवारचे राशीभविष्य

वाल्मिक कराडवर मोक्का लागताच सुरेश धसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

वाल्मिक कराडला लागोपाठ दुसरा मोठा धक्का, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

“हो, पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट माझ्यासाठी…”, करीना कपूरच्या ‘त्या’ वक्तव्याने हादरलं होतं बॉलिवूड

वाल्मिक कराडच्या आईची तब्येत खालावली; अन्न-पाणीही सोडलं!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .