Top News देश

कोरोनाने आपल्याला सगळ्यात मोठा संदेश दिला, स्वावलंबी व्हा- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने देशआचे पंचप्रधान नरेंद्र मोदी देशातील सरपंचांशी संवाद साधत आहेत. यावेळी कोरोनाच्या कठीण काळात गावांनी काय खबरदारी घेतली पाहिजे तसंच येणाऱ्या काळआत कशा पद्धतीने वाटलाच केली पाहिजे याविषयी ते बोलत आहेत.

कोरोनाने आपल्याला स्वावलंबी होण्याचा सगळअया मोठा संदेश दिला असल्याचं मोदी म्हणाले. गावाने आपल्या मुलभूत गरजांसाठी स्वावलंबी झालं पाहिजे. तालुक्याने आपल्या गरजा स्वत: भागवल्या पाहिजेत तसंच जिल्हा आणि राज्याने देखील आपापल्या स्तरावर स्वावलंबी होऊन पावलं टाकली पाहिजेत. आणि अशा तऱ्हेने देशाने देखील वाटचाल केली पाहिजे, असं ते म्हणाले.

कोरोनाच्या या संकटकाळात गावातील लोकांनी आपल्या संस्काराचे आणि परंपरांचे दर्शन घडविले असल्याचं मोदी म्हणाले. खेड्यांच्या अपडेट आता मोठ-मोठ्या विद्वानांनाही प्रेरणा देतात, असं ते म्हणाले.

एवढं मोठं संकट आलं आहे… इतकी मोठी जागतिक महामारी परंतू या  2-3 महिन्यांत आपण हे देखील पाहिले आहे की भारतातील नागरिक मर्यादित स्त्रोतांच्या दरम्यान अनेक अडचणींना बळी पडण्याऐवजी, त्यांच्यावर मात करून पुढे जात आहेत, असे उद्गार देखील मोदींनी यावेळी काढले.

ट्रेंडिंग बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या