बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काही लोकांनी कश्मीरी जनतेचा फक्त वापर करून घेतला; मोदींचा काँग्रेसवर निशाणा

नवी दिल्ली |  काही लोकांनी काश्मीरी जनतेचा फक्त वापर करून घेतला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कलम 370 विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाल्यानंतर यावर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाच देशवासियांशी संवाद साधत आहेत.

कलम 370 मुळे काश्मीरमधील नागरिकांचं नुकसान झालं, असं मत मोदींनी व्यक्त केलं. 35 ए आणि कलम 370 चा गैरफायदा पाकिस्तानने घेतला, असंही ते म्हणाले.

जम्मू काश्मीरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना इतर केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या सुविधा देणं आमची प्राथमिकता आहे. आतापर्यंत बहुतांश सुविधा मिळाल्या नाही याची तातडीने अंमलबजावणी होईल, असं आश्वासन मोदींनी दिलं आहे.

कलम 370 रद्द झाल्याने बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि करोडो देशवासियांचं स्वप्न पूर्ण झालं, असंही ते म्हणाले.


महत्वाच्या बातम्या-

-रोहित शर्माचा ‘तो’ रेकाॅर्ड ‘हा’ भारतीय खेळाडू मोडण्याच्या तयारीत!

-सरकारने पुरग्रस्त शेतकऱ्यांना 100 टक्के कर्ज माफी करावी- शरद पवार

-“छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीनं राज्य चालवलं… तसं राज्य आपल्याला निर्माण करायचंय”

-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान

-“सांगली-कोल्हापुरातली पूरस्थिती हाताळण्यासाठी शरद पवारच हवेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More