Top News

विविधतेत एकतेचा मंत्र आज उजळून निघाला; अयोध्या निकालानंतर मोदींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली |  शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या वादावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावरच आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. तसंच विविधतेत एकतेचा मंत्र आज उजळून निघाला, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केलं आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर भारताची लोकशाही मजबूत असल्याचं दिसून आलं, असंही मोदी म्हणाले आहेत. अयोध्या निकालानंतर भारतीयांच्या भूमिकेचं कौतुक करावं तितकं कमी आहे, असंही ते म्हणाले.

आजच्या निकालानंतर भारताची न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र आहे. कठीण पेचप्रसंगावरही कायद्याने तोडगा काढणं शक्य असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच राम मंदिर होईल तर मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचा निकाल दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या