कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद

नाशिक | कांद्याला कमी भाव मिळत असल्याने नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी 1064 रुपयांची मनी आॅर्डर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली होती. त्याची दखल आता थेट पीएमओ कार्यालयाने घेतली आहे.

पीएमओ कार्यालयाने कांदा प्रश्नी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून  माहिती मागवली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबद्दलचा अहवाल पीएमओ कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती मिळतेय.

कांद्याला 100 ते 200 रुपये क्विंटल असा नाममात्र भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हताश झाला होता. आता पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतल्याने यावर तोडगा निघणार अशी आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान, कांद्याचा भाव घसरल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी

-दंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; शिवसेनेनं राज ठाकरेंची उडवली खिल्ली

-मीही शरद पवारांना भेटणार होतो- दीपक केसरकर

-राम मंदिरावरून धमक्या देणाऱ्या मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांचा खात्मा करू!

-राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगल घडवण्याचा कट रचतोय!