नवी दिल्ली | कोणी आम्हाला छेडल्यास आम्ही त्यांना सोडणार नाही, असं आपल्या सैन्याने सांगितलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘राष्ट्रीय कॅडेट कोअर’च्या कॅडेट्सना संबोधलं आहे.
दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय कॅडेट कोअर’ रॅलीमध्ये पंतप्रधानांनी सहभाग घेतला तेव्हा त्यांनी रॅलीचे निरिक्षण केले.
सैन्याने आधीच स्पष्ट संदेश दिला आहे की, आम्हाला जर कोणी डिवचलं तर आम्ही कोणाला सोडत नाही. आपण शांततेचे प्रबळ समर्थक आहोत. पण भारताच्या संरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असं मोदी पाकिस्तानच्या कारवायांबाबात बोलताना म्हणाले.
दरम्यान, आगामी काळात राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा आणि कठिण निर्णय घेणार असल्याचंही मोदींनी आश्वासन दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–“हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका”
-भारतीय संघाची मोठी दहशत; आता न्यूझीलंड पोलिसांनीही घेतली दखल
-भाजपच्या अतुल भोसलेंना काही जमलं नाही; पृथ्वीराज चव्हाणच ठरले किंग…
–महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत
–सोशल मीडियावर मोदींची बदनामी करणं ‘या’ पक्षाच्या नेत्याला पडलं महागात