गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील भाजपच्या आघाडीमुळे मोदी खूष!

नवी दिल्ली | गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या आघाडीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा खुललाय. संसदीय कामकाजासाठी सभागृहात प्रवेश करताना विजयाची खूण दर्शवत मोदींनी आनंद व्यक्त केला.

काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिलं होतं. दलित, ओबीसी आणि पटेल समाजाची मोट बांधून काँग्रेसनं भाजपसमोर कडवं आव्हान उभं केलं होतं.

दरम्यान, केंद्रातील सत्तेची साडेतीन वर्षे पूरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते.