बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वेळ, स्थिती आणि व्यवस्था बदलली पण बुद्धांचा विचार आजही निरंतर- मोदी

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत आज देशवासियांना संबोधित केलं. वेळ, स्थिती आणि व्यवस्था बदलली पण बुद्धांचा विचार आजही निरंतर आहे. बुद्ध हे केवळ नाव नसून मानवतेचा विचार आहे. बुद्धाची दया, करुण, समभाव आणि स्वीकार ही बुद्धांची चार सत्य देशाची प्रेरणास्थान आहेत, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.

बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने बुद्ध धर्मगुरूंच्यामध्ये येण्याचं भाग्य नेहमीच आनंददायी असतं. मात्र सध्याची स्थिती पाहता ते शक्य नाहीये. तरीदेखील व्हर्चुअल कम्युनिटीच्या माध्यमातून मी आपणाशी संवाद साधतोय यापेक्षा अधिक आनंद तो काय? असं म्हणत त्यांनी संपूर्ण देशआला बुद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

बुद्ध कोणत्याही एका परिस्थितीत मर्यादित नाहीत, तो कोणत्याही एका विषयापुरता मर्यादित नाही. सिद्धार्थचा जन्म, सिद्धार्थ गौतम होण्याआधी आणि नंतरही काळाची चक्र अनेक शतकांपासून निरंतर चालू आहे, ज्यात बर्‍याच घटना, परिस्थिती यांचा समावेश आहे. परंतू वेळ, स्थिती आणि व्यवस्था बदलली पण बुद्धांचा विचार आजही निरंतर, असं ते म्हणाले.

प्रत्येक जीवनातील अडचणी दूर करण्याचा संदेश आणि संकल्प यांनी नेहमीच भारताच्या सभ्यतेला, संस्कृतीला दिशा दर्शविली आहे. भगवान बुद्धांनी भारताची ही संस्कृती आणखी समृद्ध केली आहे. ते स्वत: चा दिवा स्वत: बनले आणि आयुष्याच्या प्रवासात त्यांनी इतरांचेही जीवन प्रकाशमान केलं, असंही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी सोडण्यासाठी एस.टी. धावणार- परिवहनमंत्री

महत्वाच्या बातम्या-

‘राज’पुत्राचा मुख्यमंत्र्यांना फोन; उद्धव यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद

कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं हीच बुद्धांची शिकवण- नरेंद्र मोदी

आजच्या संकटातून मात करण्याची प्रेरणा आपण बुद्धांकडून घेऊ शकतो- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More