Narendra Modi | जगभरात लठ्ठपणा (Obesity) वेगाने वाढत असून, या गंभीर समस्येमुळे आरोग्य धोक्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून, नागरिकांना खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. लठ्ठपणा कमी करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.
लठ्ठपणा: एक जागतिक समस्या :
पंतप्रधान मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीचा संदर्भ देत सांगितले की, २०२२ मध्ये जगभरात सुमारे २५० कोटी लोक गरजेपेक्षा जास्त वजन असलेले किंवा लठ्ठ होते. लठ्ठपणा हे केवळ एकट्या व्यक्तीची समस्या नसून, सार्वजनिक आरोग्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चार पटीने वाढले आहे, जे अधिक गंभीर आहे.
Narendra Modi l खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन :
पंतप्रधानांनी नागरिकांना प्रत्येक महिन्याला स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलामध्ये १०% कपात करण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, “तुम्ही ठरवा की, दरमहा १०% कमी तेल वापरायचे.” त्यांनी लोकांना हे देखील सुचवले की, त्यांनी इतर दहा लोकांना तेल कमी वापरण्यास प्रोत्साहित करावे, ज्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी मदत होईल.
आरोग्यावर होणारे दुष्परिणाम :
जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, आणि लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह आणि तणाव यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. निरोगी जीवनशैली आणि योग्य आहाराच्या माध्यमातून या आजारांपासून बचाव करणे शक्य आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देताना तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला.