बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल; पंतप्रधान मोदींचा इशारा

नवी दिल्ली | कोरोनाला रोखायचं असेल तर त्याच्या संक्रमणाच्या सायकलला तोडावं लागेल. काही लोक गैरसमज पसरवत आहेत की आहेत की, सोशल डिस्टंसिंग फक्त रुग्णांसाठी आहे. मात्र, तसं नाहीये. सोशल डिस्टंसिंग प्रत्येकासाठी आहे. काही लोकांचे चुकिचे विचार तुम्हाला, परिवाराला आणि पुढे पूर्ण देशाला मोठ्या संकटात टाकतील. पुढे असेच चालू राहिलं तर भारताला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या आठवड्यात दुसऱ्यांदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. तसंच आज रात्रीपासून कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव असेल असं सांगत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना यातून वगळलं असल्याचं ते म्हणाले.

देशाला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी हा निर्णय लागू असेल. आज रात्री 12 वाजल्यापासून घराबाहेर पडण्यास मज्जाव असेल. हा एकप्रकारचा कर्फ्यूच आहे. आपल्या घराबाहेर लक्ष्मण रेखा आखून घ्या. रेषा ओलांडाल तर कोरोनासारखा महाभयंकर रोग घरी घेऊन याल. त्यामुळे घरातून बाहेर पडू नका, अशी विनंती त्यांनी देशवासियांनी केली आहे. देशात आज तुम्ही जिथे असाल तिथेच राहा, पुढील 21 दिवस तिथून हलू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जनता कर्फ्यूला सगळ्या देशवासियांनी सफल केलं. त्यांच्या उस्फूर्त सहभागाने जनता कर्फ्यू यशस्वी झाला. तसंच देशावर संकट आल्यावर सगळे एकत्र येतात, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग आहे. या रोगाला हरवण्याचा विलगीकरण हाच एकमेव उपाय आहे. सामान्यांपासून पंतप्रधालादेखील हाच उपाय असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त

“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”

महत्वाच्या बातम्या-

आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग- पंतप्रधान मोदी

पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More