देश

नरेंद्र मोदींना आत्तार्यंत कोणकोणत्या प्रकरणी मिळालं क्लीन चीट!

नवी दिल्ली | यंदाच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणांच्या माध्यमांतून त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. त्यातील काही वक्तव्यावरुन विरोधीपक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मात्र निवडणूक आयोगाने तब्बल नवव्यांदा क्लीन चीट दिली आहे. पाहूयात कोणत्या कारणांवरुन मोदींना निवडणूक आयोगाने क्लीन चीट दिली आहे.

  1. वर्ध्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडच्या अल्पसंख्यांक बहुल जागेवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती.
  2. लातूरमध्ये जवानांच्या नावानं मत मागितल्याप्रकरणी मोदींना निवडणूक आयोगाने क्लीन चीट दिली होती.
  3. नांदेडमध्ये काँग्रेसची हालत टायटॅनिक जहाजासारखी बोलल्याप्रकरणी आयोगाने क्लीन चीट
  4. राजस्थानच्या बाडमेरमध्ये दहशतवाद्यांना तिकडे मारलं मात्र त्रास इथे झाला, असं म्हणाले होते. यावरही आक्षेप घेण्यात आला होता. त्यावरही क्लीन चीट मिळालं.
  5. वाराणसीतील भाषणातील नवा भारत दहशतवाद्यांवर थेट कारवाई करतो, असं म्हटलं त्यावरही क्लीन चीट.
  6. गुजरातमधल्या भाषणात विंग कमांडर अभिनंदन यांचा उल्लेख केल्याचा प्रकरण निकाली काढलं, त्यावरदेखील क्लीन चीट.
  7. कर्नाटकमध्ये चामरानगरमध्ये राहुल गांधींनी कागद न घेता 15 मिनटं बोलून दाखवावं
  8. अहमदाबादमध्ये मतदानाच्या दिवशी रोड शो करत उघड्या जीपमधून जाऊन मतदान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चीट
  9. कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये जवानांच्या नावे मत मागितल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने क्लीन चीट दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला आणखी 2160 कोटी रूपयांची मदत

-फाईनलचं तिकीट कोण मिळवणार? पहिला क्वालिफायर सामना आज

-DYSP च्या निष्काळजीपणामुळे 16 जवानांचा मृत्यू; वीरपत्नीचा गंभीर आरोप

-राजीव गांधींना ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणणं मोदींना पडलं महागात; काँग्रेसने दाखल केली तक्रार

-“‘या’ नेत्याला पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन; उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती धमकी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या