बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंनी केल्या ‘या’ तीन मागण्या

मुंबई | देशात अनलॉकिंग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील मोदींनी संवाद साधून महाराष्ट्राची परिस्थिती जाणून घेतली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी सुरूवातीलाच अनलॉकिंगविषयी मला काही बोलायचं आहे असं म्हणत टाळेबंदीत शिथीलता आणल्याबरोबर महाराष्ट्र शासनाने आर्थिक चक्र किती आणि कशी वेगाने फिरवली याची माहिती दिली तसंच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने 12 मोठ्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहितीही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.

या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या.  काही औषधांच्या उपचार पद्धतीला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर मान्यता मिळावी, शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी आदेश देण्यात यावेत आणि परीक्षांसाठी देशभर एकच धोरण असावं, अश्या प्रमुख आणि अतिशय महत्त्वाच्या मागण्या यांनी केल्या.

कोरोनाची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितलं की, महाराष्ट्र शासनाने गेल्या काही दिवसांत राज्यात तब्बल 3 लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच फिल्ड हॉस्पिटल्स उभारले आहेत. यावेळी त्यांनी आज लोकार्पण झालेल्या बीकेसी मैदानावरील दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाची तसेच नेसको येथील कोविड रुग्णालयाची छायाचित्रेही पंतप्रधानांना दाखवली.

ट्रेंडिंग बातम्या-

पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत”

महत्वाच्या बातम्या-

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; भाजपच्या ‘या’ माजी नेत्याची नरेंद्र मोदींकडे मागणी

पुण्यात अनलॉकिंग केलं, पुणेकरांनी शिस्त मोडली… महापालिकेने ‘फिरणं’ बंद केलं!

कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, केला मोठा निर्णय जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More