Top News देश

‘राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने…’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना चिमटा

नवी दिल्ली | बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दरभंगा येथे रॅली पार पडली.  या रॅलीवेळी आपल्या भाषणातून नरेंद्र मोदींनी विरोधकांना चिमटा काढला.

सर्वांची आता अयोध्येवर असून गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं टाळ्या वाजवत असल्याचं म्हणत नरेंद्र मोदींनी टोला लगावला.

प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याचं मोदींनी सांगितलं.

दरम्यान, आम्ही गरीबांना बँक खाती देऊ असं सांगितलं होतं. आज जवळपास 40 कोटी गरीबांची बँक खाती उघडली आहेत. आम्ही उज्ज्वला योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत बिहारमधील जवळपास 90 लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली असल्याचं मोदी म्हणाले.

 

 

महत्वाच्या बातम्या-

“आता यांच्या मुलांची लग्न देखील आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय”

‘आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा’; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

‘जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला अन्यथा…’; मनसेनंतर शिवसेनेचाही आक्रमक पवित्रा

‘माझा मुलगा अवघ्या 15 मिनिटात झाला कोरोनामुक्त’; डोनाल्ट ट्रम्प यांचा अजब दावा

‘तुला थोबडवनार लवकरच, मुंबईत राहून कसं करिअर बनवतो तेच बघतो’; खोपकरांचा बिग बॉसमधील स्पर्धकाला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या